अडावद येथे वनविभाग व महाजन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी सोहळा संपन्न
अडावद ता. चोपडा दि.२६(विशेष प्रतिनिधी) येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी सोहळा संपन्न झाला. एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती संदेश देण्यात आला.
संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त वनविभाग, शालेय शिक्षण विभाग यांनी जनजागृती करीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवत आपले कर्तव्य पार पाडले. पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. त्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याला जगवले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. यात निघालेल्या पालखीत विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे व श्री संत सावता महाराज यांची प्रतिमा ठेवलेली पालखी गावभर मिरवण्यात आली. यात 'झाडे लावा, झाडे जगवा ' वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा', अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावभर पालखी मिरवीत जनजागृती केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर पालखी विद्यालयातून, संत सावता महाराज मंदिर, सुभाष चौक, श्रीराम मंदिर, महात्मा फुले रोड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, ग्रामपंचायत गल्ली, विघ्नहर्ता चौक, विठ्ठल मंदिर, शिंपी गल्ली, महर्षि वाल्मीक चौक, दुर्गा देवी चौक, परत शाळेत आली.
यावेळी वनविभागाचे वनपाल योगेश साळुंखे, पांढरी वनरक्षक नवल चव्हाण, उनपदेव वनरक्षक रुपेश तायडे, वनमजूर दशरथ पाटील, वनमजूर संजय माळी, तसेच संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन, उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार, सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. महाजन, संचालक मुरलीधर महाजन, शिवदास महाजन, तुळशीराम महाजन, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन, पंकज महाजन, पालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक व्हि. एम. महाजन, एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन , तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन , वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार आदींनी परिश्रम घेतले.