कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.)कक्षाचे उद्घाटन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
वसई: दि. 15 जुलै(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता(A .I.)कक्ष उद्घाटन व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सन्मान सोहळ्या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. मोहन कोंगेरे , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री. विनय पाटील , स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होत. रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी श्री. कोंगेरे साहेबांच्या शुभहस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. विलासराव जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . तदनंतर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती धारक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रायगड विभागीय अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व विद्यार्थ्याना पटवून दिले. तसेच स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून संपूर्ण रायगड विभागात जुचंद्र शाखेचे नाव सर्वच गुणवत्ते मध्ये प्रथम क्रमांक असल्याचे नमूद केले.
सन्माननीय पुरुषोत्तम पाटील साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शाखेचा इतिहास व मुख्याध्यापक श्री जगताप सर यांच्या कार्याचा गौरव केला. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी सन 1979 च्या बॅचने ट्रॉफी देऊन सहकार्य केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधत स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन व जनरल बॉडी सदस्य सन्माननीय विनय पाटील साहेब यांचा 50 वा वाढदिवस विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार श्री संजय म्हात्रे सर यांनी मानले.