प॑कज विद्यालयात "एक पेड माँ के नाम" उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना 100 रोपांचे वाटप
चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग व पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "एक पेड माँ के नाम" या उपक्रम अंतर्गत 100 रोपांचे वाटप करून सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण साठी प्रोत्साहित करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी ,आई सारखाच जिव्हाळा व प्रेम वृक्षांबाबत संवेदना निर्माण करणे आणि हरित भारताच्या दिशेने पाऊल टाकावे, या उद्देशाने "एक पेड माँ के नाम" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष डॉ. एस.पी बोरोले व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. तुषार योगराज देवरे व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते रोपांचे व वसुंधरेची प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
सुरवातीला विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक पी.सी.पाटील सर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सदरील कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा .श्री तुषार देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की फक्त मनुष्यप्राणी हाच वृक्षतोडीसाठी जबाबदार असतो, इतर वन्यप्राणी हे वृक्ष संवर्धनाचे काम करत असतात. वृक्षतोडीचे दुष्परिणाम व त्यामुळे पृथ्वीच्या तापमानाची होणारी वाढ याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तापमान वाढ जर आपल्याला कमी करायची असेल तर त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांनी आपल्या आई प्रमाणे जपावे असे त्यांच्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांना सांगितले. वनपाल अस्मिता पगार मॅडम यांनी विद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या वृक्षारोपण कार्यक्रम साठीच्या उत्साहाचे कौतुक केले आणि शाळा नेहमी पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते व समाजातील प्रत्येकापर्यंत वृक्षारोपण चळवळ पोहोचवते असे गौरवोद्गार काढले. संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहीत केले.बीज संकलन करून शेताच्या बांधावर बीजारोपण करा, प्रत्येकाने कमीत कमी 1 किलो बीज संकलन करून आपल्याला उपलब्ध जागेवर बीजारोपण करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. संस्थेने आज पर्यंत सुमारे 10,000 वृक्ष लागवड केलेले असून आधी स्वतः केले आणि सर्वांना वृक्षारोपण करायला सांगितले, आपणही स्वतः 10 रोपे लावा असा सल्ला उपस्थितांना त्यांनी दिला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागातर्फे एक पेड माँ के नाम उपक्रम साठी 100 रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले व सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री .तुषार देवरे, वनपाल रविंद्र दत्तात्रय भामरे , वनपाल श्रीमती अस्मिता आत्माराम पगार, वनरक्षक श्रीमती सुवर्णा बारकू कुंभारे , वनरक्षक श्रीमती कविता दंगल पाटील , श्री गुणवंत दिलिप देसले, दिपक नारायण कोळी , श्री अंकुश नारायण भिल व विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन आर वाघ यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया पाटील, आर के माने, यु आर गुजर, एम पी पाटील, संजय भादले, विनोद जाधव, व्ही ए निकम, डी आर सोनवणे, जयेश मंडपे, बाजीराव तायडे, ज्योतिसिंग राठोड, पी जे पाटील, सचिन देवरे, वैशाली पाटील, पौर्णिमा भादले, वैशाली चौधरी, अजय सैंदाने, जितेंद्र महाजन, योगराज रायसिंग, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, विजय पाटील , वेलसिंग बारेला, गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.सर्व विद्यार्थ्यांना रोप लागवड करून एक पेड माँ के नाम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवरांनी आवाहन केले