मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू..पालकांचा ह्रदयद्रावक आक्रोश
जळगाव दि.२ (प्रतिनिधी) – येथील नागेश्वर कॉलनी परिसरात चार वर्षीय बालक अंगणात खेळत असताना कुत्र्यांनी अचानक हल्ला करून लचकेतोडत नक्की तोडात खेचाकाची करत असताना शेजारील लोकांचे लक्षात आले असता कुत्र्याच्या तावडीतून बालकास रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बालकास मयत घोषित केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून मयताचे पालकांनी महापालिका प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण केल्याचे समजते.
अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार दि. १ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नागेश्वर कॉलनीत घडली. यावेळी शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाईक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील नागेश्वर कॉलनीत सचिन गायकवाड हे वास्तव्यास आहे. त्यांचा चार वर्षाचा मुलगा अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (वय ४, रा. नागेश्वर कॉलनी) हा सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी परिसरात असलेल्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात बालकाच्या मानेचे लचके तोडल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. हा प्रकार बालकाच्या कुटुंबियांचासह शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करीत बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत बालकाला मयत घोषीत केले. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याचे कळताच गायकवाड यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डॉक्टरांनी बालकाला मयत घोषीत केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला. शासकीय रुग्णालय मध्ये नातेवाईकांनी संताप व्यक्त करत महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.