सर्वसामान्यांची लालपरीचा प्रवाशांच्या हस्ते ओटी भरून आगळावेगळा वाढदिवस साजरा...चोपडा आगारात ७७ वा वर्धापन दिन साजरा
चोपडा,दि.२ ( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळा च्या चोपडा आगारात एस टीचा ७७ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रम राबवुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख महेंद्र पाटील होते तर कार्यक्रमासाठी प्रवाशी बांधव व कर्मचारी बांधवाच्या उपस्थितीत प्रवाशी बांधवाच्या हस्ते सपत्नीक सजवलेली एस टी चे ओटी भरून औक्षण करून आगार प्रमुख महेंद्र पाटील व महीला प्रवाशी भगीनींच्या हस्ते केक कापुन वाढदिवस ( वर्धापन दिन)साजरा करण्यात आला. तसेच प्रवाशांचे देखील यावेळेस गुलाब पुष्प व पेढे देवुन सत्कार करून चोपडा आगारात आगळावेगळा पध्दतीने एस टी चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.७७ वा वर्धापन दिनानिमित्त संपुर्ण आगार परीसर स्वच्छ व सुंदर करून रांगोळी काढुनी फुलमाळा व तोरणाने संपुर्ण आगाराची सजावट करण्यात आली होती.यावेळी नितीन सोनवणे, सिध्दार्थ चंदनकर,परेश बोरसे, ईश्वर चौधरी,सागर सावंत, नरेंद्र जोशी,पंडीत बाविस्कर,शाम धामोळे, भगवान नायदे,मुरलीधर बाविस्कर,कलिम शेख, प्रसन्न पाटील, सचिन कदम, रिजवान सैय्यद,विजय सोनवणे , धनंजय पाटील,साई उपहारगृहाचे संचालक जयदिप पाटील,राजश्री परदेशी,रिना पाटील, वृषाली बैसाणे,निर्मला बाविस्कर,मिनल बाविस्कर, सह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.