वाळकी -शेदणी जि.प.शाळेला सरपंचांच्या हस्ते टी.व्ही संच भेट..ग्रा.पं सदस्यांच्या दातृत्वाने होणार गेट
चोपडा दि.१(प्रतिनिधी)तालुक्यातील वाळकी शेंदणी ग्राम पंचायत मार्फत १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मराठी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला तर ग्रामपंचायत सदस्याने पदरच्या पैशांनी शाळेसाठी प्रवेश द्वार बांधून देण्याच्या जागेवर नारळ फोडून श्रीगणेशा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळा येथे मराठी शाळेचे गेट हे ग्रामपंचायत सदस्य डाॅ,बालरवी साहेबराव सुर्यवंशी यांच्याकडुन करून देण्यात येतआहे त्या ठिकाणी नारळ फोडुन कामाला प्रारंभ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही व संगणक संच लोकनियुक्त सरपंचा सौ.रुखमाबाई वसंतराव कोळी यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
यावेळी सरपंच रुखमाबाई वसंतराव कोळी ,डाॅ, बालरवी साहेबराव सुर्यवंशी ,अमोल युवराज पाटील ग्रामसेवक, अजित मुलचंद पाटील ,भरत वसंत कोळी, सोमनाथ नारायण ठाकरे ,गणेश शरद कोळी,दिपक विनायक पाटील ,प्रल्हाद गोबजी कोळी, भावडु अशोक पाटील ,मनोहर भालचंद्र पाटील ,शिक्षक राममृती कोळी सर अंगणवाडी शिक्षिका कविता प्रकाश कोळी ,पुष्पा बाई पाटील व सर्व सदस्य तसेच स गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते