भिंत कोसळून अंगावर पडल्याने जखमी झालेले डॉ.मुसाखान यांचा अखेर मृत्यू..
चोपड्यात,दि.१७(प्रतिनिधी) काल आलेल्या जोरदार तुफानी वादळाने भिंत पडून गंभीर जखमी झालेल्या डॉ.मुसा खान उस्मान खान कुरेशी यांचा दुर्दैव मृत्यू ओढवला आहे रात्री उशिरापर्यंत मृत्यूशी झुंज देत अखेर दीड वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबीयांवर दुर्दैवी आघात झाला आहे. पावसाळ्या आधीच घोंघावणाऱ्या वादळाने बळी घेतल्याने शेतपुऱ्यात स्मशान शांतता पसरली आहे.दरम्यान आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तीव्र दुःख व्यक्त करीत सांत्वन केले.
आज दुपारी मयत डॉ.मुसाखान उस्मान खान कुरेशी यांचे पार्थिव शरीराचे अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.काल वादळाने शेजारच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळून मुसा खान कुरेशी होते यांच्या घरावर पडली असता घरातील दोन जण जखमी झाले होते . त्यात मुसाखान यांची तब्येत चिंताजनक झाली होती त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री १:३०च्या सुमारास प्राण ज्योत मालवली.घटनेचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली.