चोपड्यात विजांचा कडकडाटासह तुरळक गारांचा पाऊस.. अनेक झाडे कोलमडली.. मध्यरात्री पर्यंत वीज गायब झाल्याने नागरिक संतापात

 

चोपड्यात विजांचा कडकडाटासह तुरळक गारांचा पाऊस.. अनेक झाडे  कोलमडली.. मध्यरात्री पर्यंत वीज गायब झाल्याने नागरिक त्रस्त .. राज्यात ५दिवस‌ विजांचा कडकडाटासह पाऊस : पंजाबराव डख यांचा अंदाज 



चोपडा दि.१८(प्रतिनिधी): आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे चोपडा शहरातील वीज व्यवस्था पूर्णतः कोलमडली.  शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  काही भागात तुरळक गार पडली असून बऱ्याच ठिकाणी वृक्ष कोलमडून पडल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने चोपडा अंधारात आहे. वृक्षांना दोन  उभ्या चिरा पडल्याचे चित्र  पाहावयास मिळाल्याने वीज पडल्याने हा प्रकार झाला की पावसाने असा यक्ष प्रश्न जनतेत निर्माण झाला. अंधाराचे साम्राज्य पसरल्याने कुठे काय? काय झाले याबाबत अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.मात्र विजांचा १५मिनिटे कडकडाट ऐकावयास मिळाल्याने अनेकांनी घरांच्या दरवाजे फाटक पटापट केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान आशा टॉकीजजवळ तार तुटून पडल्याचे माहिती समोर आली.रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.वीजखोळंब्यामुळे नागरिकांना अंधारात वेळ काढावा लागत असून, घरातील वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

राज्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता .. पंजाबराव डख यांचा अंदाज 

*पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुण्यात येलो तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट,  हवामान विभागाचा अंदाज पर्यावरण अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तसे त्यांनी जाहीर केले आहे.

▪️राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर परिसरात  देखील पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसापासून शहरातील वातावरण ढगाळ आहे.

▪️पुढील 24 तासांसाठी पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या आठवड्यात पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा काहीसा दिलासा मिळाला आहे.

▪️पुढील पाच दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

▪️त्यामुळे पुणे शहराला पावसाचा 'यलो' अलर्ट, तर जिल्ह्याला 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे.

*राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता*

▪️राज्यभरात मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

▪️त्यामुळे दोन दिवस संपूर्ण राज्याला 'यलो' अलर्ट दिला आहे. कोकण परिसरात सोमवार (ता. 19) आणि मंगळवारी (ता. 20); तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवार व बुधवारी (ता. 21) काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

▪️ विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस; तर कोकणात रविवारी (ता. 18) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

▪️त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने