चोपडा फार्मसी महाविद्यालयात अत्याधुनिक उपकरण हाताळणी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

 चोपडा  फार्मसी महाविद्यालयात  अत्याधुनिक उपकरण हाताळणी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न.. 


चोपडा दि.९(प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात विविध उपकरणे वापरण्यासंबंधी कार्यशाळा दिनांक 09/04/2025 या रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. जळगाव येथील रिलायबल श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख श्री अनिल विसपुते यांनी चतुर्थ वर्षाच्या  विद्यार्थ्यांना फार्मसी  क्षेत्रात उपयुक्त असणारे अत्याधुनिक  उपकरणे कशी हाताळावी व फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये औषध निर्माण  करण्यासाठी या उपकरणांचा होणारा उपयोग व त्यांची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यशाळेत चतुर्थ वर्षाच्या एकूण 118 विद्यार्थ्यांनी तसेच सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.  ही प्रशिक्षण कार्यशाळा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाले पाहिजे आणि ही आजच्या काळाची गरज आहे आणि महाविद्यालयात हि कार्यशाळा दरवर्षी आयोजित करण्यात येते  असे मनोगत प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांनी सांगितले.     

              फार्मास्युटिकस या विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.भरत व्ही जैन, आयक्यूएसी प्रमुख प्रा.डॉ. सुवर्णलता एस. महाजन, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.तनवीर शेख,  प्रा.डॉ.किरण डी. बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

      या  कार्यक्रमाला महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ.सौ.स्मिता संदिप पाटील,उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे, रजिस्ट्रार श्री. प्रफुल्ल बी. मोरे तसेच इतर  सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले 

 विभाग प्रमुख प्रा.डॉ. संदीप पवार, प्रा. योगेश चौधरी,डॉ.प्रेरणा महाजन, प्रा.डॉ.रूपाली पाटील,  प्रा.सौ. कांचन पाटील, प्रा.भूषण पाटील,तसेच  इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने