आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील सर्व पिण्याचे पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वछता सर्वेक्षण
चोपडा दि.९(प्रतिनिधी) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ पवन सुशीर, डॉ अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे.आज दिनांक- 9 एप्रिल 2025 बुधवार रोजी आरोग्य वर्धीनी उपकेंद्र- वडगांव बु.येथे आरोग्य सहाय्यक-वाय.आर.पाटील, राहुल नेहरकर यांनी भेट दिली.
याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.भुषण देशमुख, आरोग्य सेवक- विजय देशमुख उपस्थित होते,आरोग्य सहाय्यक-वाय.आर.पाटील, राहुल नेहरकर यांनी उपकेंद्राचे दप्तर तपासणी करून आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक तसेच पाणी पुरवठा करणारे जलसुरक्षकयांचेसमवेत,ग्रामपंचायत वडगांव बु. येथे गावांत होत असलेल्या पाणी पुरवठा मुख्य स्रोतांची पाहणी केली.
पाणी पुरवठा स्वच्छता सर्वेक्षण अभियाना अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या सर्व मुख्य स्त्रोतांची पाहणी केली,
पाण्याच्या टाकीचा व व्हॉल्वचा परिसर स्वच्छ असल्याचे दिसून आले, व व्हॉल्व गळती, व पाईप गळती नसल्या बाबत त्यांनी खात्री करून घेतली,पाणी पुरवठा कर्मचारी- भगवान पाटील यांचे कडून..पाण्याची टाकी नियमित धुण्यात येत असल्याची खात्री केली.पुरेसा TCL पावडरचा साठा असल्याचे दिसून आले,TCLपावडरची साठवणूक सुस्थितीत व हवा बंद बरणीत असल्याचे दिसून आले,एकूण उपकेंद्राचा स्वच्छ परिसर व पाणी पुरवठ्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
