राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष वलय सुनिल पाटील यांच्या प्रयत्नांनेपार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडा बस स्थानकावर मोफत जलसेवेचे उद्घाटन

 

राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष वलय सुनिल पाटील यांच्या प्रयत्नांनेपार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडा बस स्थानकावर मोफत जलसेवेचे उद्घाटन

चोपडा,दि.२५(प्रतिनिधी) : येथील बस स्थानकावर उन्हाळ्याच्या तीव्र झळा पाहता प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असल्याचे लक्षात घेऊन माजी जि.प.सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष  सुनिल पाटील, वाळकी ह्या़च्या मार्गदशानाने व वलय सुनिल पाटील, वाळकी, चोपडा (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मिडीया)ह्यांच्या प्रयत्नाने एस.टी. स्टँडच्या आवारात पार्थ अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत जलसेवेचे उद्घाटन माजीआमदार  कैलासबापू पाटील ह्यांच्या शुभहस्ते व आगार प्रमुख श्री. महेंद्र पाटील  ह्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी श्री. परेश देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ),श्री. गिरीश देशमूख (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ),श्री. रमाकांत बोरसे (चेअरमन मराठा पतपेढी ),एँड. दिनेश वाघ, नरेंद्र  पाटील, धनजंय  पाटील ईत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने