चोपड्यात मुस्लिम बांधवांकडून पहलगाम मधील मृतांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली

 चोपड्यात मुस्लिम बांधवांकडून पहलगाम मधील मृतांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली


चोपडा दि.२६( प्रतिनिधी) : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध २६ पर्यटकांची धर्मांध अतिरेक्यांनी केलेली हत्या ही प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोलवर जखम करणारी दुर्दैवी घटना असून या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना चोपड्यात मुस्लिम बांधवांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

 चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन हल्ला करणारे अतिरेक्यांना कडक शासन करून लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी केली व मुस्लिम बांधवांकडून अतिरेकी हल्ल्यात मृतांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने