शेकडो ज्योतींमधून प्रकटल्या सहवेदना; चोपड्यात पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली
चोपडा दि.२५(प्रतिनिधी)- पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध २६ पर्यटकांची धर्मांध अतिरेक्यांनी केलेली हत्या ही प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोलवर जखम करणारी दुर्दैवी घटना असून या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना चोपड्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी एकत्र येत मेणबत्त्या प्रज्वलित करुन मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट केल्या व भ्याड हल्ल्याचा शांततामय मार्गाने निषेध नोंदवला.
कुठल्याही घोषणा न देत संयमितपणे निषेध नोंदवून भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शांतीमंत्राचे पठण करण्यात आले. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, ॲड. घनश्याम पाटील , आशिष गुजराथी, प्रवीण गुजराथी, अश्विनी गुजराथी, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, हितेंद्र देशमुख, अनिल वानखेडे, राजाराम पाटील, शशिकांत पाटील, ॲड. डी.पी. पाटील, दीपक भानुदास पाटील, गोविंद गुजराथी, शशी देवरे, दिलीप नेवे, प्रमोद बोरसे, महेंद्र बोरसे, एस. बी. पाटील, नौमान काजी, शाम परदेशी, छाया गुजराथी, प्राचार्य डॉ. सौंदाणकर, सुनील बारी, सुनील पाटील, अरुण संदानशिव, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी... यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. संजय बारी यांनी सूत्रसंचालन तर अवधूत ढबू यांनी भारतमाता गौरव गीत सादर केले. शहरातील ओटा परिवार, पीपल्स बँक, सार्वजनिक सेवा ट्रस्ट, पुष्टीमार्गीय गुजराथी समाज, राजे छत्रपती शिवाजी मित्रमंडळ, श्री शिवजन्मोत्सव समिती यांच्यावतीने नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.