पाच वर्षाच्या मुलीवर २५वर्षीय नराधमाचा बलात्काराचा प्रयत्न.. संशयित आरोपीस पब्लिक मार..पोस्को कायद्याने गुन्हा दाखल

 पाच वर्षाच्या मुलीवर २५वर्षीय नराधमाचा बलात्काराचा  प्रयत्न.. संशयित आरोपीस पब्लिक मार..पोस्को कायद्याने गुन्हा दाखल

चोपड़ा दि.16(प्रतिनिधि) -- शहरातील एका पाच वर्षीय आदिवासी मुलीवर मध्यप्रदेशातील 22 वर्षीय नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला आहे .नराधमावर  शहर पोलिसांत गुन्हा  नोंदविण्यात आला असून  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चिमुकलीची जोर जोरात किंकाळ्यांचा आवाज ऐकुन परिसरातील जनतेने बालिकेची सुटका करून सदरील युवकास चांगलाच चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या बोलण्यातून समजते.या घटनेने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

     याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीअशी की, मध्यप्रदेशातील रा.पिपऱ्यापानी ग्रा.प. चिलऱ्या ता वरला येथील राहणारा आरोपी मयाल गिरदार वास्कले वय 22 वर्ष याने सार्वजनिक जागी खेळत असलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला  उचलून चोपड़ा गोरगावले रस्त्यावरील  एका वाईन शॉप च्या बाजूला असलेल्या झोपड्या मध्ये नेत विवस्त्र करून  व स्वतः कपडे उतरवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत होता चिमुरडीचा किंकाळ्या ऐकून आज बाजूच्या लोकांनी धाव घेऊन चिमुरडीची सुटका केली. व सदरील नराधम नको त्या अवस्थेत सापडल्याने चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

 शहर पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठून  पीड़ित मुलिसह संशयीत आरोपिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी पीड़ित मुलीवर डॉ तृप्ति पाटिल यांनी तात्काळ उपचार सुरु केले.आरोपीची वैध्यकिय तपासणीची  डॉक्टरानी केली असून अधिक माहिती मात्र प्राप्त होऊ शकली नाही.याप्रकरणी सदरील  बालिकेचे वडिलांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत मचाल वास्कले याचे  विरुद्ध  गुन्हा रजिस्टर क्रमांक( भाग 6) 0229 / 2025 भा. न्याय संहिता कलम 64 ,65 (2 ) पोस्को कलम 4,8 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे .पुढील तपास सपोनी एकनाथ भिसे हे करीत आहेत .

 *घटनास्थळी पोलिस अधिकारी ठाण मांडून* 

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांनी भेट दिली.

पीड़ित मुलीची पुढील वैधिकीय तपासणी सुरू आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर घटनेतील सत्यता स्पष्ट  होईल.आरोपीस जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे वैधकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयीत आरोपि हा आदिवाशी असल्याने त्यांची भाषा पोलिसांना समजत नव्हती त्यामुळे गुन्हा नोंदविन्याचे कामकाजात अड़चण येत होती मात्र डॉ. चन्द्रकान्त बारेला हे उपजिल्हा रुग्णालयात आल्याने बोली भाषाचा प्रश्न सुटला  पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे काम सोपे झाले यावेळी डॉ. बारेला यानी घटनेचा तिव्र निषेध करुन कारवाई करण्याची मागणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने