पंकज नगर परिसरात आज उद्या दोन दिवस नगर परिषद आपल्या दारी..घर पट्टी..पाणीपट्टी त्वरित भरा व नळ कनेक्शन मोफत जोडा : मुख्याधिकारींचे आवाहन
♦️ संधी हुकल्यावर होईल चार आण्याची कोंबडी अन् बारआराण्या मसाला..
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)चोपडा नगरपरिषदे मार्फत नगरपरिषद आपल्या दारी ही मोहीम जोमात सुरू असून शहरवासीयांनी या योजनेचा लाभ घेत घर पट्टी व पाणी पट्टी पटापट भरून नवीन पाईप लाईनला आपले नळ कनेक्शन जोडून घ्यावे अन्यथा मुदत संपल्यावर मोफत जोडणी सवलतीचा फायद्याला मुकावे लागण्याची नामुष्की ओढवून घेऊ नका असे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील व कर निरिक्षक प्रणव पाटील यांनी केले आहे.*
नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडून दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी पर्यंत शहरातील बोरोले नगर 1, बोरोले नगर 2, रत्नदीप नगर, रामकुवर नगर, पंकज नगर, अनंत नगर आणि लगतच्या भागातील जुनी पाईपलाईन बंद करून नवीन पाईपलाईन सुरू करण्यात येणार आहे. या भागात नवीन पाईपलाईन वर कनेक्शन करण्यासाठी नगरपरिषदे मार्फत बोरोले नगर 2 मधील मूकबधीर विद्यालय या ठिकाणी दिनांक 16 व 17 एप्रिल 2025 रोजी सकाळी नऊ ते सकाळी 11 आणि दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत कॅम्प लावण्यात येणार आहे. तेथे घरपट्टी पाणीपट्टीची थकबाकी रक्कम जमा करून नवीन नळ कनेक्शन साठी लागणारे आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज करावा. त्यानंतर अमृत दोन योजनेअंतर्गत नळकनेक्शन जोडण्यात येणार आहे. मुदत संपल्यानंतर आणि रस्ता तयार झाल्यानंतर नळ कनेक्शन जोडण्यात येणार नाही .आणि त्यानंतरच्या नळ कनेक्शन जोडणी धारकांना तोडफोड व जोडणी खर्च स्वत: द्यावयाचा असल्याने" चार आण्याची कोंबडी अन् बारआराण्या मसाला" या उक्तीप्रमाणे परिस्थिती होईल तरी जागरूक नागरिकांनी या मोफत संधीचा लाभ घेऊन तात्काळ नळ जोडणी कलेक्शन करून घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन श्री . पाटील यांनी केले आहे .