आमदारांच्या मार्गदर्शनात युवा उद्योजक पियुष चौधरींनी वाटल्या भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्या
चोपडादि.१६(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनात युवा उद्योजक पियुषभाऊ चौधरी यांच्या पुढाकारातून बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आल्या .
शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी मध्यमवर्गीय लोक छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना सावलीची नितांत गरज असते.त्यासाठी छत्री वाटपाची दूर दृष्टी ठेवून पियुषभाऊ चौधरी यांनी सर्व भाजीपाला विक्रेत्यांना छत्री वाटप केली .
यावेळी चोपडा कृऊबा चे सभापती नरेंद्र पाटील,शहर पोलिस स्टेशन चे पीआय मधुकर साळवे,राजेंद्र पाटील बिटवा,किशोर चौधरी,कृउबा संचालक ॲड शिवराज पाटील,गोपाल पाटील,किरण देवराज,सुनिल बरडिया,विपीन जैन,दिव्यांक सावंत,बिलाल शेख,प्रदिप बारी,नंदू गवळी,मोईन कुरेशी,जावेद शेख,योगेश पाटील,अनुप जैन,आबिद शेख,ईलु शेख,सुनिल पाटील,अतुल चौधरी,भुषण भिल पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.