*नागलवाडीला नाला खोलीकरणास प्रारंभ.. पाण्याच्या पातळी वाढीस गुजराथींचे योगदान महत्त्वपूर्ण*
चोपडा,दि.१६(प्रतिनिधी) : येथूनजवळच असलेल्या नागलवाडी शिवारात नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. प्रदीप गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बऱ्याच शिवारात दरवर्षी नाला खोलीकरणाची कामे होत आहेत. गेल्या सात वर्षांपासून सतत नागलवाडी गावात वेगवेगळ्या नाल्यांवर खोलीकरणाचे काम होत असल्याने आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना नवीन बोर करावा लागला नाही किंवा ट्यूबवेलची पाण्याची लेव्हल कमी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांचे सहकार्य दरवर्षी वाढत आहे. या कामाच्या शुभारंभावेळी ग्रामस्थ, शेतकरी व ट्रॅक्टरधारक उपस्थित होते