चोपडा शहरात विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)येथे भारतीय बौद्ध महासभा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पंचशील नगर,गौतम नगर,भीम नगर मल्हारपुरा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पाटीलगढी खाईवाडा , सुंदर गढी रमाई नगर आदी भागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सवाद्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.बाबासाहेबांचे विचारांना घरा घरातून उजाळा देण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी केले.
शहरातील नगरवाईज अध्यक्षांनी केले पूजन 1)पंचशील नगर जयंती उत्सव मंडळ
अध्यक्ष - बंटी अहिरे
2) गौतम नगर
अध्यक्ष विजय पंडित वानखेडे
3) भीम नगर मल्हारपुरा
अध्यक्ष अजय शिरसाठ
उपाध्यक्ष अजय सैंदाणे
4) डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पाटीलगढी खाई
अध्यक्ष विनोद खजुरे
उपाध्यक्ष भीमराव अहिरे
5) सुंदर गढी रमाई नगर
अध्यक्ष तेजस वाडे
वरील जयंती मंडळाच्या अध्यक्षांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सामुदायिक वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ व बापूराव गिरधर वाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास मल्ल्या अर्पण केले.
प्रबोधनाचा कार्यक्रम खालील वक्त्यांनी आपल्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रबोधन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, उत्तम सोनकांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थ्यांना संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य या विषयावर सुदाम रामदास करणकाळ, प्राध्यापक आधार पान पाटील सर यांनी भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बापूराव वाणे,शालिक करंदीकर, सुदाम करणकाळ अशोक बाविस्कर, गोपाळराव सोनवणे, संतोष अहिरे,डॉक्टर बनकर, संजय साळुंखे,रामचंद्र आखाडे, एडवोकेट चंद्रकांत सोनवणे, नितीन वाल्हे संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भरत भीमराव शिरसाठ शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले