उत्तर विभाग पीक संरक्षण सोसायटी निवडणूक बिनविरोध..चेअरमनपदी युवराज महाजन,व्हा.चेअरमन ललितकुमार गुजराथी
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)- शहरातील चोपडा उत्तर विभाग पीक संरक्षण सहकारी सोसायटीची २०२५ ते ३० या पंचवार्षिकची संचालक मंडळ निवडणूक चोपडा कसबे सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या विशेष प्रयत्नांनी बिनविरोध पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी डी.आर.पुरोहित यांनी काम पाहिले.
या निवडणुकी नंतर चेअरमन पदावर युवराज दगडू महाजन यांची तर व्हा.चेअरमन पदावर ललितकुमार अविनाश गुजराथी यांची यांची एकमताने निवड करण्यात आली.या संचालक मंडळात प्रवीण विठ्ठलदास गुजराथी,विश्वंभर प्रकाश बारी,विजय काशिनाथ पाटील,आनंदा लोटन माळी,अभिमन तुकाराम चौधरी,दिलीप बुधा बडगुजर,अशोक नथ्थू धनगर,तुळसाबाई नथ्थू महाजन,संजय सदाशिव गवळी,नारायण सुका बाविस्कर यांचा समावेश आहे.नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन होत आहे.