जय नारायण नगरात आमदार निधीतील ६५लाखाच्या रस्ता कामास प्रारंभ.. रहिवासी करतायं रस्त्याची" क्वालिटी चेक"

 जय नारायण नगरात आमदार निधीतील ६५लाखाच्या रस्ता कामास प्रारंभ.. रहिवासी करतायं रस्त्याची" क्वालिटी चेक"

चोपडा  दि.१५(प्रतिनिधी)  विधानसभेचे माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व विकासाचे शिल्पकार आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नांने शहरभर रस्ता कामे धुमधडाक्यात पार पडत असून आज जयनारायण नगर मधील फेज 2 चे फायलन रोडचे कॉंक्रीटिकरणाला  प्रारंभ झाला असता रहिवासी बांधवांनी उभे राहून काम करून घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आमदार निधीतून 65 लाखाचा निधि उपलब्ध करून दिला आहे या रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले असून मिक्सर मशीनचे पुजन काकाजी श्री कन्हैयालालजी देसरडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी कामाची क्वालिटी रहिवासींनी उभे राहून तपासणी करून  रोड लैवल चेक करुन 6 ईची चॅनल लावला की नाही खात्री करून  चांगले काम करण्याची विनंती ठेकेदारांला केली.

याप्रसंगी सुनिल बरडिया, नंदकिशोर न्याती, महेश देसरडा, नितिनभाऊ चौधरी, सागर, यशवंतराव चौधरीसर, कमलेश चोपडा, विपिन बरडिया, संदिप खिंवसरा , पियुष खिलोसिया, गणु पाटिल आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने