बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचे हित जोपासले : डॉ.पानपाटील

 बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचे हित जोपासले : डॉ.पानपाटील

लासूर ता‌.चोपडादि.१५(वार्ताहर) येथे पंचशिल मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथिल लोकनियुक्त सरपंच श्रीमती नर्मदाबाई भिल ह्या होत्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते म‌.फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज,राजेश्री शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर,रमाई आंबेडकर,संत रविदास यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान या विषयावर बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करतांना सर्व समाजाचे हित जोपासले डॉ .आधार पानपाटील सरांचे व्याख्यान संपन्न झाले त्यांनी आपल्या व्याख्यानात संविधानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कसे हे साध्या सोप्या भाषेत सांगितले यावेळी येथिल माजी सरपंच देविलाल वाघू बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपसरपंच अनिल पाटील, चोपडा सुत गिरणी चे संचालक अमृतराव वाघ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या‌ पो ‌.नि‌.कावेरी कमलाकर मॅडम, येथिल पोलिस पाटील जितेंद्र पाटील यांच्या सह सर्व ग्रा‌.पं.सदस्य, तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविलाल बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन वारडे सरांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने