चौगावला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भोयकर यांची भेट

 चौगावला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भोयकर यांची भेट 

चौगाव,दि.२३ (प्रतिनिधी)नुकतीच चोपडा तालुक्यातील चौगाव येथे साठ टक्के लोकांना किडणीचे आजार झाले असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी लावून धरली होती.त्यानंतर प्रशासनाचा आरोग्य विभागाला जाग आली.व चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर , डॉ नितीन अहीरे आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर व कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली तसेच पाण्याचे नमुने तपासणी अहवाल सादर केले त्यात चौगावात फक्त पंधरा किडणी पेशंट, तीन डायलेसीसवर उपचार घेणारे तर आठ जणांना किडणीला सुज असल्याचे निष्पन्न झाले.तसेच पाण्याचा मागील एप्रिल २०२४ चा जैविक व रासायनिक तपासणी अहवाल योग्य असुन या वर्षीचा रासायनिक तपासणी अहवाल आला नसला तरी जैविक अहवाल नुसार पाण्याचा टिडीएस चारशे छत्तीस असून पाणी पिण्यायोग्य आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही .आजारपणाची कुठलीही लक्षणे दिसल्यास लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी दिली . तसेच ग्राम पंचायत फिल्टर प्लॅनचे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने