सक्सेस स्पोर्ट्स तर्फे ५३ शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूजचे वितरण
चोपडा,दि.23(प्रतिनिधी) - शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या क्रीडा विषयक प्रगतीसाठी मदतीचा हात पुढे करत चोपडा येथील सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे ५३ शालेय खेळाडूंना स्पोर्ट शूज वितरण करण्यात आले. महिला मंडळ माध्यमिक विद्यालय व कोळंबा येथील एकूण ५३ विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशन विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करत तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात कामगिरी करत आहे.
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आयोजित स्पोर्ट्स शूज वितरण प्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी,
सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष सचिन पाटील, खजिनदार प्रदिप बारेला, सचिव मनोज जाधव, सहसचिव सतिष कोळी, सभासद जितेंद्र कोळी, नंदकिशोर देशमुख, ॲड. रुपेश पाटील, मुखतार खाँ अमीर खाँ यांच्यासह महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील, व्हॉलंटरी स्कूलचे मुख्याध्यापक अरुणभाई संदानशिव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र अग्रवाल यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील पाटील व उद्योजक आशिष गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करताना सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशनचे अभिनंदन करत त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल आभारही मानले. विद्यार्थी खेळाडू पीयूष बारी याने मदतीबद्दल आभार मानले.