चोपडा बाजार समिती राज्य पातळीवर झळकली.. जिल्ह्यात दुसरा तर राज्यात २३क्रमांक पटकाविला.. आमदारांच्या मार्गदर्शनात नरेंद्र पाटलांची कारकीर्दचा शेतकऱ्यांत जोरदार गवगवा
चोपडा दि.२३(प्रतिनिधी)स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समिती पैकी चोपडा बाजार समितीचा २३ वा क्रमांक पटकावला असून नाशिक विभागा मधुन ६ वा क्रमांक तर जळगांव जिल्ह्यातुन २ रा क्रमांक आल्याची माहिती सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी दिली आहे.
जागतिक बँक अर्थसहाय्यित माननीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) स्मार्ट प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यांत येत असतो या प्रकल्पा अंतर्गत सन २०२३-२०२४ क्रमवारीसाठी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुचित केल्यानुसार चोपडा बाजार समितीने शेतकरी व बाजार घटक यांचे करीता बाजार आवारात केलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज, वैद्यानिक कामकाज व इतर निकष यांच्या आधारे पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहिती सादर केलेली होती त्यानुसार राज्यातील बाजार समित्याची वार्षिक क्रमवारी नुकतीच पणन संचालक सो, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडून प्रसिध्द करण्यांत आली आहे त्यात चोपडा बाजार समितीने यश पटकाविल्याचे स्पष्ट केले आहे.
चोपडा बाजार समितीची राज्यस्तरावरील ही गुणवत्तापूर्ण कामगिरी शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या सर्वाच्या सहकार्याने तसेच सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने मिळाल्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आमच्या कार्यकाळात बाजार समितीचा वाढलेला विस्तार, वाढलेली आवक, शेतकरी निवास, शेतकऱ्यांना सेम डे पेमेन्ट, ईतर सुविधा व त्यांना देण्यांत येणारा न्याय, व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचारी यांची शेतकऱ्याप्रती सहकार्याची भावना, पारदर्शी कारभार बाजार समितीच्या यशाला पुरक ठरला आहे तसेच चोपडा तालुक्यातील कार्यसम्राट आमदार प्रा. आण्णासो श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार ताईसौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे मोलाचे योगदान लाभले असुन यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती प्रभावशाली कार्य करीत आहे. त्यामुळे एवढे मोठे यश बाजार समिती मिळवू शकल्याचे सांगत यापुढे देखिल चोपडा बाजार समिती शेतकरी हितासाठी व प्रगतीसाठी प्रयत्नशिल राहील अशी ग्वाही श्री. नरेंद्र वसंतराव पाटील यांनी दिली आहे.