रेषांतर" चित्रप्रदर्शन पुण्याच्या आर्ट गॅलरीत..

 रेषांतर" चित्रप्रदर्शन पुण्याच्या आर्ट गॅलरीत..

 चोपडा दि.२१(प्रतिनिधी)मुंबईत युवा चित्रकारांनी एकत्र येऊन    जिविधलम नावाच्या आर्टिस्ट गृप ची निर्मिती करून पहिलेच चित्रप्रदर्शन..मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरविले.जितेंद्र साळुंके,विरेंद्र सोनवणे.धनराज पाटील,लक्ष्मीकांत सोनवणे.महेद्र पाटील  या चित्रकारांची इतर ठिकाणी ही चित्र प्रदर्शने झालीत. आता येत्या दि.२२ ते २७ एप्रिल या कालावधीत पुणे शहरातील घोले रोडवरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत, रेषांतर.. हे शीर्षक असलेले चित्र प्रदर्शन होत आहे.प्रसिद्ध चित्रकार व मान्यवरांच्या' हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

 मुळात हे चित्रकार ग्रामीण भागातील असल्याने कामानिमित्त शहरात स्थायीक झाले.तरी रंग -रेषांशी  आपले नाते जुळवून आहेत.आपल्या चित्रात ग्रामीण भागातील जिवनाचं मुळ चित्रण रंग रेषांतून मूर्त-अमूर्त स्वरूपात मांडली आहेत.

*जितेंद्र साळुंके यांची सामाजिक चित्रे*

प्रदर्शनातील काळ्या शाईतील चित्रात जगण्यातील वास्तव,काळ्या शाईतील रेषा विषयाला अधिक गडद करतात. गावकुसाबाहेरील माणसांच जगणं तसेच सामाजिक संवेदनांना, दुःख,आक्रोश,यातना,विविध आकारशयातून विषयाला प्रेक्षकांसमोर मांडतात.आंदोलन,संघर्ष,लोकल ट्रेन, कोलाहल,आक्रोश,भयावह शांतता या सारखे विषय चित्रात येतात.

*विरेंद्र सोनवणे यांची निसर्गातील घटक चित्रे .*

निसर्गातील गाणं कॅनव्हास मांडतांना.निसर्गातील पक्षी,फुल,वेल झाडे या घटकातून चित्रांची निर्मिती जी मानवीसंवेदनांशी निगडित आहे.पक्षी हा चित्रात केंद्रस्थानी ठेवून वेदना,आशा,आकांक्षा,प्रेम,हिसांचार,माणसा-माणसातली ओढाताण.अशा काळ्या शाईतील व कॅनव्हास वरील चित्र वेधकपणे मांडतात.

*धनराज पाटील यांची निसर्गातील सुक्ष्म चित्रे*

निसर्गातील झाडांची अवाढव्य मुळं,हवेच्या वेगाने सळसळणारी झाडाची पाने,फांद्या,अशा घटकांना रंग रेषांतून धनराज पाटील प्रभावी पणे मांडतात.पिपंळपानाचे सुक्ष्म बारकाव्याने काढलेली रेखाटने.तसेच उंच झाडांची काळया शाईतील डौलदार रेखाटने,अतिशय सुंदर आहेत. कॅनव्हासवरील लयदार रेषा पांढर्‍या पार्श्वभूमीवरील गडद काळ्या रंगाने चित्र प्रभावी होते.

*लक्ष्मीकांत सोनवणे यांची सामाजिक वेदनेची कॅनव्हास चित्र*

 ग्रामीण कष्टप्राय जीवन अगदी जवळून अनुभवले आहे.भुकेने व्याकूळ असलेले कुटुंब ,दारिद्र्य,संघर्ष,जिवनाचा अर्थ यांसह असंख्य विषय सोनवणे यांच्या चित्रांत आहेत.विषय आणि माध्यमांतून विषयाची परिणामकारकता आणि प्रेक्षकांच्या मनात वेदनेची असंख्य वादळे निर्माण करतात. लक्ष्मीकांत सोनवणे यांची चित्रे कॅनव्हासवरील सामाजिक आहेत.पेपर वरची काळ्या शाईतील रेखाटने अमाप वेदनेतून मनावर  आघात करतात

*महेंद्र पाटील यांची अ‍ॅक्रिलीक माध्यमातील(citycape)*

मुंबई चे धकाधकीचे जगणं,अ‍ॅक्रिलीक माध्यमातून मांडताना.प्रेक्षकांसमोर गगनचुंबी इमारती,ऐतिहासिक वास्तू,रहदारी ने  भरलेले रस्ते यांचे मुंबईच्या सिटीस्केप मध्ये ऊन सावल्यांचा खेळ रंगातून टिपला आहे सिटीस्केप मधील अधिक रंगातील समायोजन हे चित्राला आकर्षक बनवितात.जून्या धाटणीच्या इमारती,आणि त्या साठी वापरण्यात आलेली रंग संगती या  मुळे चित्र आकर्षित करतात.सर्व चित्रकार खान्देशातील मातीतील आहेत.सदर प्रदर्शंन ११ ते ७ या वेळेत पाहता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने