योगी संस्था व शिवाक्ष फाउंडेशन जळगावच्या संयुक्त विद्यमाने गौऱ्यापाडा शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
चोपडा दि.११(प्रतिनिधी): तालुक्यातील आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगात वसलेल्या गौऱ्यापाडा गावात योगी संस्था आणि शिवाक्ष फाउंडेशन जळगाव च्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
गेल्या पाच वर्षापासून योगी संस्था या गावामध्ये पर्यावरण आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. सदर गावात इयत्ता १ ली ते ५वी मधील १०६ विद्यार्थी गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात, त्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, शैक्षणिक साहित्य, खेळण्याचे साहित्य आणि शाळेसाठी पंखे य वाटप करण्यात आले. आजवर यातली अनेक मुले प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पुस्तके ठेवून शाळेत येत होती. योगेश्वर जोशी यांच्या प्रयत्नातून शिवाक्ष फाउंडेशनने ही मदत विद्यार्थ्यांना पुरवली आहे.
सदरील कार्यक्रमाला वन विभागाचे ACF प्रथमेश हडपे, बी. जी. महाजन, कृष्णापूर गावचे सरपंच गेमा दादा, शाळेचे मुख्याध्यापक चंपालाल बारेला, योगी संस्थेचे अमित मोहिते,रेवार्थ गोविंदवार, प्रकाश बारेला, तेजस्विनी पाटील आणि प्रणिल चौधरी यांची उपस्थिती होती.यावेळी सरपंच उमर्टी--दिनेश रमेश पावरा,उपसरपंच--संदीप सुभाष सांगोरे ,नर्सिंग किसन बारेला, प्रकाश जामसिंग बारेला, गोविंद मगन बारेला, सुभाष भिकमसिंग बारेला, विजय रामजी बारेला, सविता गोविंद बारेला, वैशाली बारेला,दारासिंग बिसन बारेला, आपसिंग सुरभान बारेला,देविदास रेमसिंग बारेला आदी उपस्थित होते 
योगी संस्थेच्या प्रतिनिधींनी सदरील भागातील शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
योगी ही लोकसहभागातून चालणारी चळवळ आहे, आपण आर्थिक मदतीद्वारे आम्हाला बळ देऊ शकता ! अधिक माहितीसाठी संपर्क : प्रणिल- 94214 65476)
