आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते शहरी आरोग्यवर्धीनी केंद्रांचा शुभारंभ..गरिब बंधू भगिनींना मिळणार गल्लीतच आरोग्य सेवा..
चोपडा,दि.११(प्रतिनिधी) शहरातील गोरं गरीब जनतेला आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने आमदार  अण्णासाहेब प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रयत्नातून  नगरपालिकेच्या १५व्या वित्त आयोगा अंतर्गत आमदार साहेबांच्या शुभहस्ते  पटवे गल्ली व नायरा पेट्रोल पंपाजवळ केजीएन कॉलनीत  शहरी आरोग्यवर्धीनी केंद्राचा शुभारंभ फीत कापून करण्यात आला.
या आरोग्य वर्धीनी केंद्रामुळे शहरातील आशा टाकी परिसरात पटवे गल्ली, व के.जी.एन. कॉलनी नायरा पेट्रोल पंप जवळील आजूबाजूच्या परिसरातील गोरं गरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मेहमूद बागवान,कृऊबा सभापती नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी, कैलास बाविस्कर,जाकीर सलीम, कालू भाई पठाण, निजाम कुरेशी, मोईन कुरेशी, सादिक तेली,अरमान सय्यद मजहर सय्यद , काल्याभाई सय्यद ,हाजी अजहर भाई बिलाल भाई शेख, राज मोहम्मद शेखलकर जमीलभाई मणियार,फरमान मिस्तरी,विकी जयस्वाल बबलू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी परिसरातील नागरिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
