हभप.प्रा.डाॅ.सुशिलजी महाराज विटनेरकर यांनी वारकरी संस्कृती पुरक कपडे परिधान करून दिल्लीत स्विकारले पि.एच.डी पदवी प्रमाणपत्र
चोपडा दि.१३(प्रतिनिधी)महंत.प्रा.हभप.डॉ.सुशिलजी महाराज विटनेरकर हे चोपडा तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी असून एक प्रसिद्ध राष्ट्रीय कथाकार व किर्तनकार आहेत या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करण्याचे ते काम करत असतात नुकताच दि १२/०४/२५ रोजी नवी दिल्ली दीक्षांत समारंभात अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने औषध संशोधन या विषयात डॉक्टर इन फिलॉसॉफी (पीएचडी) हा सन्मान प्रदान केला तसेच वारकरी वेशभूषेच सर्वत्र कौतुक होत आहे या ठिकाणी विविध देशांतील वरिष्ठ लोक उपस्थित होते
