नेवे वाणी समाज विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षस्थानी रमेश नेवे वाणी
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) - नेवे वाणी समाज विकास प्रतिष्ठान कल्याण मुंबई परिसर या संस्थेच्या सदस्यांची बैठक उदय नेवे,आंबिवली यांच्या निवासस्थानी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप शांताराम वाणी होते. उदय नेवे यांनी सदस्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सभेमध्ये नेवे वाणी समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून रमेश रघुनाथ नेवे वाणी(अडावदकर) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री रमेश वाणी यांनी मंडळ आर्थिक दृष्ट्या बळकट करणे , देणगीसाठी विशेष मेहनत करणे तसेच संस्थेसाठी मेहनत करून वेगळे अस्तित्व निर्माण करणे या बाबीवर भर दिला.त्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष म्हणून उदय नेवे सचिव संजीव वाणी व खजिनदार म्हणून रुपेश नेवे यांची निवड केली.नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन होत आहे.
