ते झाले फौजदार .. अन् सुदर्शन कॉलनीत व्हायला लागले सत्कार

 ते झाले फौजदार .. अन् सुदर्शन कॉलनीत व्हायला लागले सत्कार

चोपडा दि.०१(प्रतिनिधी) शहरातील सुदर्शन कॉलनीतील निवासी  विशाल एम. पाटील याने एमपीएससीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करीत पोलिस दलात पीएसआय पदी नियुक्ती झाली आहे.त्याच्या नियुक्ती बद्दल कॉलनीवासियांतर्फे त्यांचा सत्कार करून यथोचित गौरव करण्यात आला आहे.

विशाल पाटील हे आडगाव येथील रहिवाशी व नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी शिक्षक श्री एम आर पाटील सर यांचे चिरंजीव असून  त्यांची  लोकसेवा आयोगामार्फत  नुकतीच पोलिस उप निरीक्षक पदी स्तुत्य निवड झाली आहे. त्याबद्दल विशाल यांचा सत्कार   शाल, श्रीफळ, बुके देउन  सौ. पूर्णिमा पाटील , सतिष पाटील, साहेबराव पाटील व सौ. कविता पाटील सोबत एम. आर. पाटील व सौ. सिमाबाई पाटील यांनी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने