आखतवाडे व गरताड विकास सोसायटीचे १०० % पीककर्ज वसुली.. कार्यकारी मंडळाचा सत्कार

 आखतवाडे व गरताड विकास सोसायटीचे १०० % पीककर्ज वसुली.. कार्यकारी मंडळाचा सत्कार

चोपडा,दि.१(प्रतिनिधी) तालुक्यातील आखतवाडे व गरताड विवीध कार्यकारी सह. सोसायटी  ह्या संस्थेची १०० % पीककर्ज वसुली केल्या बद्दल  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चोपडा शाखेत आखतवाडे सोसायटीचे चेअरमन  राजेंद्र गंगाधर पाटील, गरताड सोसायटीचे चेअरमन  रुपसिंग आनंदा पाटील यांच्या सत्कार चोपडा शाखा विभागीय उपव्यवस्थापक  अजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

 या प्रसंगी आखतवाडे सोसायटीचे सचिव  साहेबराव पाटील, कर्मचारी  मंगल पाटील, गरताड सोसायटीच सचिव शरद मोरे, कर्मचारी  बाळकृष्ण पाटील यांच्याही सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. या प्रसंगी किशोर कदम,  सतिष पाटील, शितल शिंदे, माधुरी पाटील, कुदंन पाटील, संजय पाटील, मुक्तार दादा, सचिन पाटील, श्याम पाटील, बाळु पाटील, बॅक अधिकारी  दिलीप पाटील, माजी शाखा व्यवस्थापक  डी. बी. पाटील उपस्थित होते. या प्रसंगी दोघ सस्थेचे संचालक मंडळ व सभासद यांचेही आभार मानले.

तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक चेअरमन  सजंय पवार व बँकेचे संचालक श्री.घनश्याम भाऊ अग्रवाल यांनी आखतवाडे व गरताड सोसायटी 100% वसुली केल्या बद्दल आखतवाडे व गरताड सोसायटीचे चेअरमन राजेद्र पाटील व व्हॉ. चेअरमन व संचालक मडंळ यांचे अभिनंदन केले.या वेळी खास उत्कृष्ट काम करतात म्हणून श्री सतिष पाटील यांच्या सत्कार श्री राजेंद्र पाटील चेअरमन आखातवाडे यांच्या हस्ते करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने