नवनिर्वाचित पीएसआय विशाल पाटील यांचा दोडे गुर्जर समाजातर्फे सत्कार

 

नवनिर्वाचित पीएसआय विशाल पाटील यांचा दोडे गुर्जर समाजातर्फे सत्कार


चोपडा दि.३१(प्रतिनिधी)तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी विशाल एम. पाटील याने एमपीएससीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करीत पोलिस दलात पीएसआय पदी नियुक्ती झाली आहे.त्याच्या नियुक्ती बद्दल दोडे गुर्जर समाजातर्फे त्यांचा सत्कार करून यथोचित गौरव करण्यात आला आहे.

विशाल पाटील हे आडगाव येथील रहिवाशी व नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी शिक्षक श्री एम आर पाटील सर यांचे चिरंजीव असून  त्यांची एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उप निरीक्षक पदी स्तुत्य निवड झाली आहे. त्याबद्दल विशाल यांचा सत्कार दोडे गुजर संस्थान चे विश्वस्त श्री डी बी पाटील यांचे हस्ते करणेत आला. यावेळी श्री एम आर पाटील सर, श्री विकास पाटील सर ,श्री विजय पाटील व श्री सुनील सर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने