जवेरिया खाटीक चा वयाच्या सहाव्या वर्षी रोजा,अनेकांकडून कौतुक

 जवेरिया खाटीक चा  वयाच्या  सहाव्या वर्षी रोजा,अनेकांकडून कौतुक


गणपूर(ता चोपडा)ता 19: सध्या रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू आहेत.यात अनेक लहान मोठे मुस्लिम बांधव सहभागी होतात. या महीन्यात हे रोजे अनेक पथ्य पाळत मुस्लिम बांधव करतात.लासूर( ता.चोपडा )येथील जवेरिया जुबेर खाटीक या सहा वर्षीय चिमुकलीने तप्त उन्हात  आपल्या जीवनातील प्रथम रोजा पूर्ण केला.देशात हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहण्यासाठी तीने अल्लाह (ईश्वर) कडे प्रार्थना केली.जवेरीया ही गावातील  जुबेर खाटीक यांची मुलगी असून एवढ्या लहान वयात रोजा उपवास केल्याबद्दल तीचे ग्रामस्थ तसेच समाज बांधवांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने