बी फार्मसी महाविद्यालय चोपडा यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन भार्डू गावी संपन्न
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)भार्डू तालुका चोपडा येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भार्डू येथे करण्यात आले आहे. शिबिर दिनांक २०/०३/२०२५ ते २६/०३/२०२५ पर्यंत भार्डू या गावी राबविण्यात येणार आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री. धनराज वंजी पाटील, सरपंच सौ. शितल दिपक सोनवणे, प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे, रजिस्ट्रार श्री. प्रफुल्ल बी. मोरे, मुख्यध्यापिका श्रीमती. शैला नामदेव सोनवणे, उपमुख्यध्यापिका सौ. रेखा अशोक पाटील, ग्रामसेवक श्री. गजानन धनराज पाटील, तलाठी श्री. भूषण शांताराम पाटील व महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय शशिकांत पाटील हे उपस्थित होते.
तसेच या उद्घाटन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित मंडळी म्हणून श्री. बाळकृष्ण शंकर पाटील, श्री. विकास जनकराव पाटील, श्री. दिलीप एकनाथ पाटील, सौ. रेखाबाई विजय पाटील, श्री. दिनेश नारायण पाटील, श्री. मुकेश वसंतराव पाटील, सौ. सुनिता सुभाष पाटील, सौ. सुनंदा प्रकाश ठाकूर, श्रीमती. निर्जलाबाई रोहिदास सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन तसेच स्वर्गीय दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील व स्वर्गीय आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी रासेयो स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व स्वविकास साधावा असे आवाहन केले. तसेच संस्कार कसे जपावे व आपल्या वागण्यातून ते प्रत्यक्ष अमलात आणावे असे सांगून श्रमसंस्कार शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सौ. सुवर्णलता महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र श्रावणे यांनी मानले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, उपाध्यक्षा श्रीमती. आशाताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास पाटील, प्रा. रोहित पाटील, प्रा. योगेश चौधरी , प्रा. भूषण पाटील, प्रा. सौ. कांचन पाटील व शिक्षकेतर कर्मचारी श्री. भागवत सोनवणे, श्री. शिवदास सोनवणे तसेच रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे सहकार्य मिळाले.