गौरीपाडा येथे निघाला संशयित हत्तीरोगाचा रुग्ण

 

गौरीपाडा येथे  निघाला संशयित हत्तीरोगाचा रुग्ण

चोपडा दि.२०(प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर प्रा.आ.केंद्राअंतर्गत गौरीपाडा येथे  संशयित हत्तीरोगाचा रुग्ण निघाल्याने आदिवासी भागात रुग्ण तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक-१९ मार्च २०२५ बुधवार रोजी, अती दुर्गम तथा अदिवासी भागातआरोग्य वर्धीनी उपकेंद्र-उमर्टी अंतर्गत येत असलेल्या गौरीपाडा या पावरा आदिवासी वस्ती मध्ये
आरोग्य केंद्राच्या टिमने आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.ही तपासणी सुरू असतांना संशयित हत्तीरोगाच्या रुग्णाचे रक्तजल नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेत असतांना हा रूग्ण आढळून आला आहे.
यावेळी जिल्हास्तरीय  पर्येंवेक्षक-विजय देशमुख,आरोग्य सहाय्यक-सुनील महाजन, आरोग्य सेवक-संदीप शिंदे,
अशोक वारे, अंगणवाडी सेविका-कमलीबाई बारेला  नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने