अडावद येथे महाएल्गार मेळावा नियोजन बैठक संपन्न

 अडावद येथे महाएल्गार मेळावा नियोजन बैठक संपन्न


अडावद ता. चोपडा,दि.२०(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली  २२ रोजी संपन्न होणाऱ्या  मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने सर्व ओबीसी बांधव कसे उपस्थित राहतील व त्या पद्धतीने नियोजन आढावा बैठक घेण्यात आला. सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन  माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकार यांनी केले. 

      २० रोजी  संध्याकाळी ७ वाजता श्री संत सावता माळी मंदिर चौकात आढाव बैठकीत सर्वसामान्यांना सोबत घेऊन ओबीसी मोर्चाला उपस्थित राहून मोर्चा संपन्न करू असे मेळाव्याचे नियोजन ठरवण्यात आले . यावेळी छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र सोनवणे , माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिमराव माळी, धानोरा माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, अडावदचे माजी सरपंच साखलाल महाजन,  वरचा माळी वाडा अध्यक्ष संजय महाजन, मधला माळी समाजाचे अध्यक्ष हनुमान महाजन, खालचा माळी अध्यक्ष नारायण महाजन, ग्रामपंचायत सदस्य पंकज महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सचिन महाजन, प्रभाकर महाजन, प्रकाश महाजन, पीक संरक्षण संस्थेचे संचालक संजय महाजन, माळी महासंघ अडावद शहर अध्यक्ष रुपेश महाजन, संचालक जगन्नाथ महाजन, संजय शेलकर, मनोहर शेलकर, अतुल महाजन, शाम महाजन, पिंटू महाजन, मनोज महाजन आदी उपस्थित होते 

     यावेळी पि. आर. माळी यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक सुधाकर महाजन यांनी तर सूत्रसंचालन व आभार एस. जी. महाजन यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने