धैर्यशाली कार्याने सौ.लिना पाटील यांचा तर सामाजिक क्षेत्रातील कार्याने स्व.सविता शिरसाठ यांचा विश्व स्वामिनी पुरस्काराने गौरव


 धैर्यशाली कार्याने सौ.लिना पाटील  यांचा तर सामाजिक क्षेत्रातील कार्याने स्व.सविता शिरसाठ यांचा विश्व स्वामिनी पुरस्काराने गौरव 

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी)तालुक्यातील पत्रकार संघामार्फत विश्व स्वामिनी पुरस्काराने  कर्तबगारी महिलांना गौरविण्यात आले आहे त्यात अनवर्दे खुर्द येथील माजी सरपंचा सौ सविता संजीव शिरसाट यांना मरणोत्तर तर पुरस्कार देण्यात आला तर सौ लीना राहुल पाटील हयांना त्यांच्या धैर्यशाली कार्यामुळे गौरविण्यात आले आहे. काम नव्हे तर कर्तव्याचा जाणीवेतून कार्य करणाऱ्या महिलांचा हा यथोचित सन्मान सोहळा नुकताच पार पडला आहे.


१५ पेक्षा अधिक गड किल्ले चढण्याचे कसब अंगी बाणणाऱ्या धैर्यशाली महिला सौ.लिना राहुल पाटील

सौ. लिना राहुल पाटील ह्या चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या पत्नी असून त्यांचे शिक्षण एम.ए.बी.एड्. झाले आहे.त्या धुळे  जिल्ह्यातील नरडाणा  येथील माहेरवाशिणी आहेत.त्यांनी आतापर्यंत क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.त्यांनी रामशेज, लळिंग, कन्हाई, सिंहगड, हरिहर गड, हरिश्चंद्र गड, चामार लेणी, रायगड, विश्रामगड, अंकाई किल्ला, पन्हाळा असे केवळ एक दोन नव्हे तर १५ पेक्षा अधिक अवघड गड किल्ले चढण्याचे  कसब  दाखविले आहे. ४०० फूट उंचीच्या शीतकडा चढून यशस्वी उतराई केली आहे. तर १३ हजार फूट उंचीवरून विमानातून उडी मारत स्कायडाईव्ह, ब्रम्हगिरीची ४३ किमीचा पायी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. या धाडसी क्रीडा प्रकारची आवड जोपासणाऱ्या सौ. लीना पाटील लवकरच ५ एप्रिल २०२५ रोजी जीवधन गड सुळका ५०० फूट क्लायंबिंग आणि रॅपलिंग करणार आहेत.त्यांच्या या अजब थरारक व धैर्यशाली कार्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

स्व.सविता शिरसाठ यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मान 

स्व. सविता संजीव शिरसाठ या जेष्ठ पत्रकार कै. बापुसो पांडूरंग नारायण शिरसाठ यांच्या सुनबाई तर संजीव पांडुरंग शिरसाठ राष्ट्रीय उपाध्यक्ष कोली कोरी सामाजिक एकता न्यु दिल्ली यांच्या पत्नी होत्या.त्यांनी अनवर्दे खु ।। ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रोजगार हमी या योजनेतून शेत रस्ते निर्माण करून दिले. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना सतावत असलेल्या प्रश्नाचे त्यांनी निरासरण केल्याने त्यांच्या या कामाचे त्यांचे त्यावेळी फार मोठे कौतुक करण्यात आले होते. जिल्ह्यात त्याकाळी रोजगार हमीच्या कामांमध्ये ग्रामपंचायतीचा क्रमांक एक आला होता. घरकुलसह विविध विकास कामे करणारे सरपंच म्हणून स्वर्गीय सविता शिरसाठ यांनी नाव लौकिक मिळिवले होते. त्यांनी २०१६ मध्ये विरांगणा झलकारीबाई महिला मंडळ स्थापन केले. मंडळा मार्फत आदिवासी महिलांसाठी साडी, चोळी अनेक वेळा त्यांनी वाटप केल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूकीत ते एकाच वेळी सासु, सुन बिनविरोध निवडून येणारे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण होते. नाशिक येथे एका अपघातात त्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने