पंकज बोरोले यांचा शुभांगी पाटील यांच्या हस्ते सत्कार..रोटरीच्या असी.गव्हर्नर पदी नियुक्ती

 पंकज बोरोले यांचा शुभांगी पाटील यांच्या हस्ते सत्कार..रोटरीच्या असी.गव्हर्नर पदी नियुक्ती

चोपडा,दि.२१(प्रतिनिधी):--पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांची रोटरी क्लब च्या असी.गव्हर्नर पदी नियुक्ती झाल्याबद्दल व त्यांच्याकडून विविध क्षेत्रात जे सामाजिक कार्य घडत असते त्याबद्दल शिक्षक नेत्या व महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्षा तथा उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

    पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था ही शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून शिक्षकां प्रती आदर असणारी,विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी झटणारी संस्था म्हणून प्रख्यात असून  हजारो विद्यार्थी घडवणारे कुटुंब म्हणून मला अभिमान वाटतो अस शुभांगी पाटील म्हणाल्या.

    त्यावेळीसंघटनेचे  कार्याध्यक्ष व शुभांगी ताई पाटलांचे खंदे समर्थक बी एम तायडे सर,जिल्हासंघटक दिनेश साळुंखे,डी.बी.पाटील,जिल्हाउपाध्यक्ष विजयानंद शिंदे, तालुका उपाध्यक्ष विशाल कंखरे,भूषण पाटील व लोकशाही चे पत्रकार मिलिंद सोनवणे  यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने