कलावंत सूक्ष्म निरीक्षण करणारा असला पाहिजे - शिल्पकार नंदकिशोर पाटील यांचे प्रतिपादन
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) - भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र, चोपडा येथे नुकतेच *चित्रगंध चित्रकला* प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. नंतर कलाशिक्षक व शिल्पकार नंदकिशोर घनश्याम पाटील श्री. आ. गं. हायस्कूल सावदा यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करून स्वर्गीय डॉ.सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चित्र प्रदर्शनात डिझाईन,वस्तूचित्र, व्यक्तिचित्र, कागदकाम,मातीकाम मोजायची चित्र,मंदिर,विवाह स्टेज व वाढदिवस स्टेज यांच्या प्रतिकृती करण्यात आल्या होत्या. प्रदर्शन एकूण 250 ते 300 कलाकृतींनी नटलेले होते. वर्षभरातील सर्व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती मांडलेल्या होत्या.
याप्रसंगी माननीय आशिषशेठ अरुणलाल गुजराथी यांनी श्री.नंदकिशोर पाटील यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला तर सौ. पूनमबेन गुजराथी, अध्यक्षा,भगिनी मंडळ चोपडा यांचे स्वागत प्राचार्य सुनील बारी यांनी केले तर माननीय मान्यवर उपस्थितांमध्ये सन्माननीय छायाबेन अरविंद लाल गुजराथी व श्रीमती अश्विनीताई गुजराथी यांचे प्रा.विनोद पाटील व संजय नेवे यांनी स्वागत केले. यावेळी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील सर्व विभागातील मुख्याध्यापक व शहरातील शाळांचे कलाशिक्षक पंकज नागपुरे, अर्जुन कोळी, कमलेश गायकवाड, वसंत नागपुरे,शकील पिंजारी, प्रमोद हरी महाजन व संदीप विद्यापीठाचे मा. निलेश बनसोडे सर व सहकारी व विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत स्वर्गीय प्रसन्न भाई वसंतलाल गुजराथी व ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थी व कलाशिक्षक यांचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली.
नंतर कर्तुत्वान गुणवंत विद्यार्थी प्रिय अभ्यासू व कार्यशील शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. त्या मध्ये माजी प्राचार्य राजेंद्र महाजन,जीवनगौरव पुरस्कृत प्रमोद हरी महाजन सर ,आदर्श कला शिक्षक पुरस्कृत, कमलेश गायकवाड, राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कृत, शेख शकील शेख अहमद, सुशील शिक्षक पुरस्कृत प्रा. संजय नेवे यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे महाराष्ट्र शासनाची इंटरमिजीएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा देऊन ए ग्रेड मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप करण्यात आले
याप्रसंगी कलाशिक्षक नंदकिशोर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात कलावंत सूक्ष्म निरीक्षण करणारा असला पाहिजे. कलेला तो जिवंत ठेवतो भरपूर स्केचेस करा त्याशिवाय पर्याय नाही. स्केचिंग विद्यार्थ्यांची लाईफ लाईन आहे. असं ते म्हणाले, दर्दी व्हा कला समजून घ्या, मग आपोआप आपण उच्च शिखरावर पोहोचणार
पाहुण्यांचा परिचय प्रा.संजय नेवे, यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य सुनील बारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.विनल पाटील व प्रा. संजय नेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक भगवान बारी,शिपाई अतुल अडावदकर आणि प्रविण मानकरी यांनी अनमोल सहकार्य केले.