आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते ८ गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ

 आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते ८ गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ

चोपडादि.२१(प्रतिनिधी) मतदार संघाचे लोकप्रिय  कार्यसम्राट आमदार प्रा.  आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवने व माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते उदया दि 22/3/2025/ वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता अकुलखेडा या गावापासून  विविध विकास कामांचा भुमिपूजनाला सुरुवात होणार आहे. अकुलखेडा, घाडवेल ,धुपे खु, धुपे बु , हातेड खु  ,हातेड बु अनवर्दै खु व शेवटी बुधगाव या गावांमध्ये लांखो रुपयांच्या विकास कामांचा श्रीगणेशा होत आहे.

*विकास कामांची नावे व रक्कम पुढीलप्रमाणे* 

 अकुलखेडा ता. चोपडा येथे बंधारा दुरुस्ती करणे ११.१० लक्ष रु. (अकरा लाख दहा हजार रुपये),घाडवेल ता. चोपडा येथे १ वर्ग खोली बांधकाम करणे१२.५० लक्ष रु. (बारा लाख पन्नास हजार रुपये),धुपे खु।। ता. चोपडा येथे १ वर्ग खोली बांधकाम करणे१२.५० लक्ष रु. (बारा लाख पन्नास हजार रुपये),धुपे खु।। ते नवीन गावठान रस्ता ते धुपे बु।। रस्ता २.५ किमी मजबुतीकरण व डांबरीकरण करणे९९.२१ लक्ष रु. (नव्यांनऊ लाख एकवीस हजार रुपये) ,प्रजिमा ४ ते धुपे बु।। १ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे३५.४८ लक्ष रु. (पस्तीस लाख अट्ठेचाळीस हजार रु.), हातेड खु।। ता. चोपडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे२४.२० लक्ष रु. (चौवीस लाख वीस हजार रुपये),हातेड खु।। ता. चोपडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ०५.०० लक्ष रु. (पाच लाख रुपये), हातेड बु।। ता. चोपडा येथे प्रा.आ. केंद्र दुरुस्ती करणे२२.४६ लक्ष रु. (बावीस लाख शेचाळीस हजार रु.),अनवर्दे खु।। ता. चोपडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे०५.०० लक्ष रु. (पाच लाख रुपये),बुधगांव ते प्राथमिक शाळा १ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण४८.४१ लक्ष रु. (अड्डेचाळीस लाख ऐकेचाळीस हजार रु.), बुधगांव येथे सामाजिक सभागृह बांधणे३०.०० लक्ष रु. (तीस लाख रुपये).

तरी कार्यक्रमास आप आपल्या भागातील नागरिकांनी,बुथप्रमुख,सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शिंदे गटामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने