गणपुरात" गो माते" ला मरणा नंतरही मिळाला असाही मान ..विधिवत पूजा करून दफन विधी.. दशक्रिया विधीच्या दिवशी अन्नदानही.. गायीच्या दुधाच्या कर्जाची पोलिस पाटील कुटुंबियांनी केली उतराई.

 

गणपुरात" गो माते" ला मरणा नंतरही मिळाला असाही मान ..विधिवत पूजा करून दफन विधी.. दशक्रिया विधीच्या दिवशी अन्नदानही.. गायीच्या दुधाच्या कर्जाची पोलिस पाटील कुटुंबियांनी केली उतराई.

गणपूर,ता चोपडा)/ऍड बाळकृष्ण पाटील ता 23:येथील पोलीस पाटील रत्नाबाई पाटील व त्यांचे पती गणेश रघुनाथ पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या 23 वर्षीय गाईची मृत्यू समयी विधिवत पूजा करून आपल्याच खळ्यात खड्डा खोदून दफनविधी केला.पाचव्या दिवशी दशक्रिया विधी करून अन्नदानही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

येथील पोलीस पाटील रत्‍नाबाई पाटील व त्यांचे पती गणेश रघुनाथ पाटील यांच्याकडे असलेल्या एका गाईने अकरा आपत्यानंतर तेविसाव्या वर्षी जीव सोडला. अकरा अपत्त्यात सहा गोर्हे व पाच वासरींमूळे 23 वर्षे गोठ्यात नंदनवन खुलत राहिले.आणि घरात दूधदुभते राहिले.त्या गोमातेचे उपकार फेडण्याचा हेतू ठेवून त्यांनी गाय वारल्यानंतर तिची विधिवत पूजा केली. घराजवळील खळ्यातच खड्डा खोदून कापड गुंढाळून तिचा दफनविधी केला. पाच दिवसात दशक्रिया विधी करून सर्व विधिवत कार्य पार पाडल्यानंतर अन्नदानही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाईच्या उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे ही भावना ठेवत 23 वर्षे घरात दूध दुभते देणाऱ्या गाईचे पांग फेडण्यासाठी हा उपक्रम केल्याचे त्यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले .

गणपूर (ता चोपडा)गाईची विधिवत पूजा करून दफनविधी करताना गणेश पाटील, युवराज पाटील, चेतन पाटील, सतीश पाटील,व शेजारी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने