धम्म प्रचारात सुगतवंस भंतेजी यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता : जयसिंग वाघ

 धम्म प्रचारात सुगतवंस भंतेजी यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता : जयसिंग वाघ 

___________________________________________


जळगाव दि.२३(प्रतिनिधी): -  पूज्य भदंत एन. सुगतवंस महाथेरो हे श्रीलंका येथून अवघ्या १३ व्या वर्षी भारतात बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्या करिता आले आणि त्यांनी जळगाव शहरात सलग ५४ वर्षे बौद्ध धम्म जनतेला समजून सांगितला त्यांनी हे  काम करीत असताना आपल्या सर्वस्वाचा त्याग केला म्हणूनच त्यांचे कार्य पुढं बौद्ध भिक्खू संघास आदर्शवत राहील असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

        अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे पूज्य भदंत एन. सुगतवंस महाथेरो यांच्या जाहीर शोकसभेचे आयोजन जेतवन बुद्ध विहारात करण्यात आले होते तेंव्हा श्रद्धांजली वाहताना वाघ बोलत होते .

     जयसिंग वाघ यांनी भंतेजिंच्या अनेक आठवणी सांगून त्यांना महाराष्ट्राच्या विविध भागात जसे धम्म परिषदे करिता बोलावले गेले तसेच ब्रिटन , अमेरिका , जपान , श्रीलंका आदी देशांमध्ये सुध्दा बोलावले गेले आहे . त्यांनी चोखामेळा वसतिगृहाच्या माध्यमातून अनेक मुलांचे जीवन घडविले आहे , वासिगृहाच्या जागेचा संघर्ष त्यांनी सोडविला  आहे असेही सांगितले .

    रंगकर्मी उदय सपकाळे यांनी भंतेजिंचा संपूर्ण जीवनपट मांडून त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती देऊन बौद्ध जनतेत जाऊन त्यांनी अनिष्ट चाली , रीती बंद करण्या बाबत केलेले कार्य सांगितले .

     बाबुराव वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करून जळगाव मधील जनतेला नवी दिशा दिली .   चंद्रशेखर अहिरराव यांनी चोखामेळा वसतिगृह उभारणी करिता आलेल्या अडचणींची माहिती दिली .

          अध्यक्षस्थानी भंतेजिंचे सहकारी आत्माराम सैंदाणे होते , त्यांनी आपल्या भाषणात संत चोखामेळा वसतिगृहाचा इतिहास मांडून तिच्या विकासार्थ पूज्य भदंत एन. सुगतवंस यांनी केलेला एकूण संघर्ष मांडला .

       सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे यांनी सांगितले की भंतेजी यांनी सुगत तथागत बुद्ध विहार उभारून नवा इतिहास घडविला . पूज्य भदंत एन. सुगतवंस महाथेरो यांची अहोरात्र सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. आनंद कोचुरे यांनी शोकसभेमागील भुमिका विषद केली . सरवातीस भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भंतेजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन ममता सपकाळे यांनी केले.

       कार्यक्रमास पी. डी. सोनवणे , नथू  अहिरे , सुनील बिऱ्हाडे, दिलीप तासखेडकर, अशोक सैंदाणे , अशोक मेढे , सुनील सपकाळे , सुमन बैसाणे , कमल भालेराव , माया भालेराव, नूतन तासखेडकर , कविता सपकाळे , रामकृष्ण सावळे , जमुनाबाई सावळे , वत्सला वानखेडे , सीमा सैंदाणे, कमल सोनवणे आदींसह बौद्ध जनता मोठ्टासंख्येने हजर होते .  कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्त घेऊन खीरदान करण्यात आले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने