चोपडा तालुक्यातील चहार्डी र्औद्योगिक विकासाला चालना मिळणार ... आमदारांशी
♦️.18.75 हेक्टर आर जमीनीवरील आराखड्यास मंजुरी..
♦️आदिवासी क्लस्टर चे नियोजन करुन ९० दिवसांत दर निश्चिती करण्याचे उद्योग मंत्र्यांचे निर्देश
मुंबई दि.१९:- दिनांक १९/०३/२०२५ रोजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या लेखी मागणीनुसार मुम्बई येथे मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली चहाडीऀ ता. चोपडा येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती यात प्रामुख्याने चोपडा औदयोगिक क्षेत्रासाठी ताबा प्राप्त 20.75 हेक्टर आर सरकारी जमीनी पैकी अतिक्रमण 2 हेक्टर जमीन वगळुन उर्वरीत 18.75 हेक्टर आर जमीनीवरील आराखड्यास मंजुरी मिळाली त्यानुसार सदर क्षेत्रावर औदयोगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी सादर केलेल्या आराखड्यानुसार द सीमांकन करण्यात आलेले असुन सदर औदयोगिक क्षेत्राचा दरनिश्चितीचा प्रस्ताव दि.11/10/2024 रोजी मुख्यालयात सादर केलेला आहे. सदर प्रस्तावास मा.मंत्री महोदय यांच्या अध्यक्षते खाली दि.१८/१२/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत चर्चे नुसार सदर ठिकाणी मौजे जांबुटके ता.दिंडोरी जि.नाशिक च्या धरती प्रमाणे आदिवासी क्लस्टर चे नियोजन करुन ९० दिवसांत दर निश्चिती करावी असे निर्देश मंत्री उदय सामंत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले
या ताबाप्राप्त क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणेसाठीचा रुपये 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव दि. 27/03/2024 पासुन मुख्यालयास सादर करण्यात आला होता त्याबाबतही या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरीचे देऊन चहार्डी ता.चोपडा येथे जलदगतीने औदयोगिक क्षेत्र विकसीत करावे असे आदेश उद्योग म़ंत्री श्री. उदय सामंत यांनी दिले.
या बैठकीला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले माजी आ. राजन साळवी व उद्योग विभागाचे कुणाल खेमणार सह मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ.श्रीकांत पुलकुंडवार(सहसचिव)आयुष प्रसाद जिल्हाधिकारी ,प्रकाश चव्हाण मुख्य अभियंता मुंबई, राजेंद्र गावडे मुख्य अभियंता संभाजीनगर , राजेंद्र गांधीले,रागिणी ढसाळ व्यवस्थापक भुसंपादन व जळगाव प्रादेशिक अधिकारी एस.एस. घाटे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे हे उपस्थित होते