समाजातील सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार -प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर
अमळनेर दि.१९ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई सहायीत , आधार संस्था संचलित लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्प अंतर्गत ,जागतिक महिला दिन निमित्त गांधलीपुरा येथील आंबेडकर भवन मध्ये ,लैंगिक कामगार भगिनींसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनअमळनेर येथील प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर , प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेची मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर , पोलीस निरीक्षक श्री केदार बारबोले ,प्रमुख वक्त्या एडवोकेट ललिता पाटील, आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ भारती पाटील कार्यकारी संचालक रेणू प्रसाद उपस्थित होते, एडवोकेट ललिता पाटील यांनी सुप्रीम कोर्ट गाईडलाईन व नुकत्याच औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकाल याविषयी सविस्तर चर्चा केली आणि महिलांना काही समाज घटकांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल देखील सांगितले अध्यक्षीय भाषणात प्रांत अधिकारी यांनी तुम्ही कुठल्याही कायद्याचे उल्लंघन न करता अठरा वर्षाच्या वरील असाल तर प्रत्येकाला संविधानाने आपल्या मनाचा व्यवसाय निवडण्याचा अधिकार व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे पण कायद्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याचे तसेच पीडित व्यक्तींबरोबर प्रशासन मदतीला असल्याचे सांगितले .
पोलीस निरीक्षक केदार बोलेसर यांनी वेश्याव्यवसाय आणि कायदा याबाबत माहिती दिली , सीओ तुषार नेरकर सर यांनी सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बाबत तसेच नगरपालिकेच्या विविध योजना विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे सुरू असलेल्या एचआयव्हीएड्स प्रतिबंध कार्यक्रम संस्थेचे विविध उपक्रम या विषयी माहिती दिली,वस्तीतील काही पीडित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. रेणू प्रसाद यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार संस्थेच्या अश्विनी भदाने यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक राकेश महाजन, मुरलीधर बिरारी , ताऊसिफ शेख ,यास्मिन शेख अनिता बडगुजर नंदिनी चौधरी यांनी मेहनत घेतली