वस्तू विकत घेतांना ग्राहक जागरूक असला पाहिजे - डॉ अनिल देशमुख

 वस्तू विकत घेतांना ग्राहक जागरूक असला पाहिजे - डॉ अनिल देशमुख 


पाचोरा दि.१९(प्रतिनिधी)- येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जिल्हा ग्राहक सं रक्षण परिषद, तहसील कार्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मोठया उत्साहात संपन्न झाले 

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा ग्राहक सं रक्षण परिषद सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांनी ग्राहक हा राजा असून त्यांनी वस्तू खरेदी करतांना जागरूक असणे, प्रत्येक वस्तू ची किंमत, दर्जा याविषयी सावध असावे असे मार्गदर्शन केले तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पाचोरा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी सर्व उपस्थिताचे स्वागत केले व ग्राहक संरक्षण कायदा व विविध पैलू ची माहिती दिली. कार्यक्रम चे अध्यक्ष तहसीलदार विजय बनसोडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्य निस्पृह व निस्वार्थ कार्य  हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचा उल्लेख करून अभिनंदन केले 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे अशासकीय सदस्य,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगच मध्यस्त पॅनल सदस्य,व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा ध्यक्ष डॉ अनिल देशमुख,पाचोरा तालुका अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष ऍड सचिन देशपांडे, अन्न व औषधी प्रमुख गिरीश दुसाने,जिल्हा वैद्यकीय प्रमुख डॉ मुकेश नैनाव,तालुका कृषी व महसूल समिती प्रमुख सौं अरुणा उदावंत,महिला व बाल कल्याण समिती प्रमुख ज्योती महालपुरे, तालुका सचिव व शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील,तालुका संघटक शरद गिते, सह संघटक डॉ प्रशांत सांगळे सह, तालुका वैद्यकीय समिती प्रमुख दिनेश सोनार, रेशन दुकानदार संघटना अध्यक्ष सुनील पाटील,विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा उकुर्डे पुरवठा निरीक्षक  यांनी केले तर सूत्रसंचालन पुरवठा अधिकारी अभिजित येवलेनी केले तर आभारप्रदर्शन तालुका सचिव सुधाकर पाटील यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने