श्री दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील तंत्रशिक्षण सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी प्रा डॉ गौतम वडनेरे व व्हा चेअरमनपदी प्रा डॉ तन्वीर शेख यांची निवड

 श्री दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील तंत्रशिक्षण सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी प्रा डॉ गौतम वडनेरे व व्हा चेअरमनपदी प्रा  डॉ तन्वीर शेख यांची निवड 

चोपडा,दि.१९(प्रतिनिधी) येतील श्री दादासाहेब सुरेश जी पाटील तंत्रशिक्षण सेवकांची पतसंस्थेच्या २०२५ ते २०३० या कालावधी साठी निवडणूक पार पडली. सदर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ  गौतम प्रकाशचंद्र वडनेरे व व्हा चेअरमनपदी  प्रा डॉ तन्वीर शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

पतसंस्थेची संचालक मंडळ देखील बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यात प्रा डॉ गौतम वडनेरे  ,डॉ. शेख तनवीर, डॉ.पवार संदीप.डॉ. पाटील रुपाली,  श्री. महाजन हरिषचंद्र, श्री.रूपवते कैलास, श्री. चौधरी नंदू गोविंदा, श्री. प्रविण सोनवणे व श्री.अजय सोनवणे या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.संचालकांनी घेतलेल्या बैठकीत प्रा डॉ स्वर्णलता महाजन यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच श्री प्रफुल्ल मोरे यांची सचिव म्हणून निवड झाली आहे.सदर प्रक्रिया श्री भूषण बारी साहेब सहकार खाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सर्व नवनिर्वाचित चेअरमन , व्हा चेअरमन , सचिव व संचालक मंडळाचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड भैय्यासाहेब संदीप पाटील , उपाध्यक्ष श्रीमती विजयाताई पाटील संस्थेच्या सचिव डॉ सौ स्मिताताई पाटील यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने