राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे चोपडृयात ईद मिलन उत्साहात साजरी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे चोपडृयात  ईद मिलन उत्साहात साजरी

चोपडा दि.31(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी. जि. प. सदस्य सुनिल पाटील (वाळकी ) यांनी  आज छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे  ' ईद मिलन 'कार्यक्रम आयोजित केला होता त्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत शुभेच्छा देऊन  एकतेचे दर्शन घडविले.राष्ट्रवादी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचे सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्ष विचारांचा मुस्लिम समुदायाने स्वागत केले. ईदच्या पावन पर्वात बंधुभाव, प्रेम, शांततेचा संदेश समाजात गेला. सर्व धर्माचे लोकांचा सहभाग चोपड्याच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन ह्या निमित्ताने घडले.मशीद, घरी व ईदगाह येथे ईद उल फितर ची नमाज अदा करुन बहुसंख्य मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात येउन सर्व समाजातील लोकानां गळाभेट घेत होते.ईद च्या पवित्र उत्सवात बहुसंख्य रोजदार उपस्थित होते.

      याप्रसंगी सुनील पाटील (वाळकीकर)चोपडा कसबेचे चेअरमन प्रवीणभाई गुजराथी,परेश देशमुख उपजिल्हाध्यक्ष,निलेश पाटील,कृषिभूषण हिरालाल पाटील,अक्रम तेली,जियाउद्दीन काझी,रमाकांत बोरसे,संचालक सूतगिरणी, सुरेश साळुंखे,रवींद्र पाटील उपसरपंच (खडगाव)चेतन पाटील घोडगाव, रावसाहेब पाटील,तुकाराम पाटील,मिलिंद सोनवणे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले होते आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने