इंग्लिश ऑल्मपियाॅड परीक्षेत महाजन क्लासेसचे ६ विद्यार्थी देशपातळीवर चमकले

 

इंग्लिश ऑल्मपियाॅड परीक्षेत महाजन क्लासेसचे ६ विद्यार्थी  देशपातळीवर चमकले

चोपडा,दि.३१(प्रतिनिधी)नुकत्याच लागलेल्या इंग्लिश ऑल्मपियाॅड परीक्षेत महाजन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देशपातळीवर झेप घेतली आहे त्यात जवळपास सहा विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली असून इयत्ता नववी मधून  सुभोध अमृत पाटील याने ९२टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे तर इयत्ता दहावी वर्गातून विनीत प्रकाश पाटील याने शेकडा 93% गुण मिळवत  पाचव्या क्रमांकावर बाजी मारली आहे.  त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे चोपडा शहरात जोरदार अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंग्लिश ऑल्मपियाॅड  ही परीक्षा इंग्रजी व्याकरणा आधारित असून महाजन क्लासेस मध्ये व्याकरणाची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येते त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी जोरदार चमक दाखवतात .या परीक्षेत दोन लेवल असतात पहिली परीक्षा पास झाल्यानंतर दुसऱ्या लेव्हलला विद्यार्थी प्रवेष्टीत होतात. यावर्षी या परीक्षेला 30 विद्यार्थी बसले होते त्यातील देशपातळीवर  सहा विद्यार्थी चमकले आहेत. त्यातून इयत्ता सहावी वर्गात पार्थ जितेंद्र माळी हा  90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे तर नववी वर्ग गटातून सुबोध अमृत पाटील 92 टक्के (५ वा क्रमांक), आदित्य सतीष भदाने ९२ टक्के (५वा क्रमांक), हितेष हरीष महाजन 90%टक्के (८वा क्रमांक), सोहम प्रवीण पाटील ९०% (८वा क्रमांक), इयत्ता दहावी गटातून विनीत प्रकाश पाटील 93% ५वा क्रमांक पटकावला आहे.
आपल्या यशाचे श्रेय क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर यांना जाते असे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.क्लासेस मार्फत ग्रामरचा चांगला सराव करून घेतला जातो म्हणून एवढे मोठे यश आमच्या पदरी पडल्याची पुष्टी विद्यार्थ्यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने