सूरमाज फाउंडेशनतर्फे गरजूंसाठी ईद विशेष शीरखुरमा किट वाटप

 सूरमाज फाउंडेशनतर्फे गरजूंसाठी ईद विशेष शीरखुरमा किट वाटप 

चोपडा दि.२८(प्रतिनिधी): सूरमाज फाउंडेशन हे एक सामाजिक संस्थान आहे जे शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे. फाउंडेशन विधवांना पेन्शन देणे, निरक्षर मुलींच्या शिवण क्लासची फी भरणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, जनजागृती मोहिमा राबवणे आणि समाजातील उल्लेखनीय कार्यांना प्रोत्साहन देणे अशा अनेक कल्याणकारी उपक्रमांमध्ये सक्रिय आहे.

हीच सेवा भावना पुढे नेत, पवित्र रमजान महिन्यात सूरमाज फाउंडेशनने चोपडा शहरातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी 450 शीरखुरमा किट वितरित केल्या. या किटमध्ये बदाम, काजू, खोबरे, मनुका, खारीक, चारोळी, साखर, शेवया आणि तूप यांचा समावेश होता. ईदच्या सणाची गोडी आणि आनंद वाढवणारा हा शीरखुरमा गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

ही मदत वाटप मोहीम गुरुवार, 27 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात सूरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख, अबुल्लैस शेख,

एडवोकेट असीम, डॉ. रागीब, शोएब शेख, जुबेर बेग, शेख मुजाहिद-ए-इस्लाम, शमीम शेख, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख आणि अन्य सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या स्तुत्य उपक्रमामुळे लाभार्थींनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि फाउंडेशनच्या या सेवाकार्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सूरमाज फाउंडेशन समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देण्याच्या आपल्या संकल्पावर कायम राहील आणि भविष्यातही अशीच समाजसेवा करत राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने