नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी संजिव पाटील तर व्हा‌.चेअरमनपदी संजय पालीवाल यांची बिनविरोध निवड


नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी संजिव पाटील तर व्हा‌.चेअरमनपदी संजय पालीवाल यांची बिनविरोध निवड

लासूर ता‌.चोपडा दि.२९(वार्ताहर) येथिल नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटीच्या चेअरमन पदी संजिव हिलाल पाटील तर व्हा‌.चेअरमन पदी संजय मगन पालीवाल यांची बिनविरोध निवड झाली.संस्थेचे चेअरमन वासुदेव मार्तंड माळी व व्हा‌.चेअरमन शकील अली निसार अली शाह यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी हि निवड करण्यात आली  यावेळी नूतन चेअरमन व व्हा‌.चेअरमन यांच्या सत्कार करण्यात आला .

यावेळी उपसरपंच तसेच पॅनल प्रमुख अनिल पाटील, शंकर सोमा महाजन, ओमप्रकाश पालीवाल, तुकाराम महाजन, विक्रम माळी, गोकुळ नाना, अजय पालीवाल,नेमीचंद पालीवाल मुन्ना वाघ,भिकन पाटील, श्रीराम पालीवाल, बापू चौधरी,बारकू पाटील, सुधीर पाटील,दिलीप पालीवाल पत्रकार,गोकुळ भाऊ साहेब, सोमनाथ सोनार, विक्रम जावरे,भिकन खंडेराव पाटील, दिपक पालीवाल तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नाटेश्वर पिक संरक्षण सोसायटीचे संचालक दिलीप पाटील, देविदास मगरे, संतोष बिह्राडे, योगेश्वर महाजन,लक्ष्मण मगरे, साहेबराव कोळी, अशोक पाटील,श्रीमती सुभाबाई महाजन,सौ‌.संगिता पाटील हे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुषण अभिमन्यू बारी (मुख्य लिपिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा) यांनी काम पाहिले त्यांना संस्थेचे सचिव निलन तडवी यांनी सहकार्य केले निवडणुकी नंतर संस्थेच्या कार्यालयापासून  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व येथिल बाजार चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तसेच येथिल दातर मियाॅला चादर अर्पण करण्यात आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने